ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹१५,६२,९६९/- असून तो प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, ५% दिव्यांग कल्याण, १०% महिला व बालकल्याण, १५% मागासवर्गीय कल्याण, रस्ते, स्मशानभूमी या क्षेत्रांमध्ये वापरला जातो।
Major Expenditure Heads
ग्रामपंचायतीच्या नियमित कार्यालयीन कामकाजासाठी लागणारा खर्च — वेतन, साहित्य, देखभाल आणि दळणवळण यासाठी निधी वापरला जातो
गावातील आरोग्य शिबिरे, शाळा विकास, आणि स्वच्छता अभियानांसाठी निधी दिला जातो.
गावातील पिण्याच्या पाण्याची योजना, जलजीवन मिशन आणि रस्त्यावरील दिव्यांची देखभाल यासाठी निधी खर्च केला जातो.
दिव्यांग नागरिकांच्या सहाय्यासाठी विशेष योजना, उपकरणे व सुविधा पुरविण्यासाठी ५% निधी राखून ठेवला जातो.
महिलांसाठी रोजगार, प्रशिक्षण, बालकल्याण व पोषण कार्यक्रमांसाठी हा निधी वापरला जातो.
मागासवर्गीय नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य व उपजीविका विकासासाठी हा निधी दिला जातो.
गावातील पायाभूत सुविधा — रस्ते, गटारे, स्मशानभूमी व सार्वजनिक बांधकामे सुधारण्यासाठी निधी खर्च केला जातो.
शेतीविषयक प्रशिक्षण, पशुवैद्यकीय शिबिरे, आणि शेती साधनांच्या खरेदीसाठी मदत यासाठी निधी दिला जातो.
गणेशोत्सव, स्वातंत्र्य दिन, आणि गावातील सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी निधी खर्च होतो.
गावातील उद्यान, पथदिवे, स्वच्छता उपक्रम आणि ग्रामसौंदर्य प्रकल्पांसाठी निधीचा वापर केला जातो.
ग्रामपंचायतीकडून स्थानिक युवक आणि महिलांसाठी विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. विशेषतः “महिला व युवती शिलाई मशीन प्रशिक्षण” हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या सहकार्याने यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे.
याशिवाय, मनरेगा (MNREGA) योजनेंतर्गत ग्रामपातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी विविध बचतगट आणि ग्रामसंघ कार्यरत आहेत. हे गट स्वयंरोजगार, सूक्ष्म उद्योग, आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय योगदान देतात.
कसारा खुर्द ग्रामपंचायत क्षेत्रात महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन यासाठी १४ सक्रिय महिला बचत गट कार्यरत आहेत. हे बचत गट ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून उद्योजकता, बचत, कर्जपुरवठा आणि कौशल्य विकास उपक्रम राबवतात.
टीप: हे सर्व बचत गट महिला व बालकल्याण विभाग, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कार्यरत असून, सदस्य महिलांना बँक लिंकेज, प्रशिक्षण, उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान आणि बचत-कर्ज व्यवस्था उपलब्ध करून देतात.